Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबई दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबईत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील माझगाव डॉकच्या 'आयएनएस खंदेरी' या पाणबुडीच्या लोकार्पणासाठी येणार आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबई दौऱ्यावर
SHARES

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबईत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील माझगाव डॉकच्या 'आयएनएस खंदेरी' या पाणबुडीच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. परंतु, ही पाणबुडी तयार नसल्यानं त्याचा लोकार्पण कार्यक्रम लांबला असून, राजनाथ सिंह यांची मुंबई भेटही लांबली आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सागरी व किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यामुळं लवकरचं सिंह मुंबईत येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नौदलाचा आग्रह

स्कॉर्पिअन श्रेणीतील 'आयएनएस खंदेरी' ही दुसरी पाणबुडी संरक्षणमंत्री सिंह यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतरच ताफ्यात घ्यावी, असा नौदलाचा आग्रह आहे. माझगाव डॉकमध्ये तयार होणाऱ्या या पाणबुडीत त्रुटी आढळल्यामुळं लोकार्पणाला विलंब होत आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी सागरी व किनारपट्टी सुरक्षा एकात्मिक केंद्राचा आढावा घेतला. देशातील सर्व किनारपट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नौदलाने गुडगाव येथे माहिती व्यवस्थापन व विश्लेषण केंद्र (आयमॅक) उभे केले आहे. या केंद्राद्वारे प्रामुख्याने हिंदी महासागर या सागराचा संबंध येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या भागांवर उपग्रहाच्या आधारे 'रिअल टाइम' देखरेख ठेवली जाते. त्यामध्येच मुंबईचाही समावेश आहे.

पश्चिम कमांडचं मुख्यालय

मुंबईत हिंदी महासागर नसला तरी, मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडचं मुख्यालय आहे. हिंदी महासागरात जाणारी बहुतांश व्यापारी जहाजे पश्चिम कमांडअंतर्गत असलेल्या अरबी समुद्राचाही वापर करतात. त्यामुळं या सर्वांच्या सुरक्षेची विस्तृत माहिती राजनाथ सिंह यांनी घेतली. दरम्यान, मुंबईच्या भेटीवर येण्याची तयारी म्हणून त्यांनी या केंद्राला भेट दिल्याचं समजतं.हेही वाचा -

बेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदान

गोविंदा पथक साधेपणानं साजरा करणार यंदाचा दहीहंडी उत्सवRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा