Advertisement

गोविंदा पथक साधेपणानं साजरा करणार दहीहंडी उत्सव

प्रत्येक गोविंदा पथकांमध्ये जल्लोषाचं वातावरणं असलं तरी, यंदा दहीहंडी उत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार असल्याची भुमिका दहीहंडी समन्वय समितीनं घेतली आहे.

गोविंदा पथक साधेपणानं साजरा करणार दहीहंडी उत्सव
SHARES

दहीहंडी उत्सव आता केवळ २ आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं मुंबईत राज्यभरातील सर्व गोविंदा पथक थरांच्या सरावात व्यस्त आहेत. प्रत्येक गोविंदा पथकांमध्ये जल्लोषाचं वातावरणं असलं तरी, यंदा दहीहंडी उत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार असल्याची भूमिका दहीहंडी समन्वय समितीनं घेतली आहे. राज्यात पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं आव्हान समोर असल्यानं त्यांच्यासाठी मदतीचा हात देऊन गोविंदा पथकेही दहिहंडी उत्सव साधेपणानं साजरा करणार आहेत. 

अतिरिक्त खर्चाला कात्री

दहीहंडी समन्वय समितीची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी 'अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनाही दहिहंडीचं आयोजन रद्द न करता त्यांच्या अतिरिक्त खर्चाला कात्री द्यावी. जेणेकरून, इतक्या वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव साजरा होईल आणि पूरग्रस्तांनाही मदतीचा हात मिळेल़', असं समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी म्हटलं.

सुरक्षेसाठी विमा

मागील वर्षी गोविदा पथकांच्या सुरक्षेसाठी विमा काढण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, ५७० गोविंदा पथकांनी विमा काढल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, वैयक्तिक पातळीवर १६८ गोविंदा पथकांनी विमा काढल्याची माहिती मिळते. सिताबेन शहा मेमोरिअल ट्रस्टच्या माध्यमातून ६६, साई सेवा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून ७०, मोहित भारतीय फाउंडेशननं १६ आणि श्री मुलुंड युवक प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून ७ गोविंदा पथकांचा विमा काढण्यात आला़ आहे. 

विमा काढणं बंधनकारक

गोविंदा पथकांसह आयोजकांनीही विमा काढणं बंधनकारक आहे. त्यानुसार, 'स्वामी प्रतिष्ठान' या आयोजकांनी २०० गोविंदा पथकांचा विमा काढला आहे. तसंच, एका खासगी एनजी ड्रिंक कंपनीनं ४३ गोविंदा पथकांचा विमा काढला आहे. या दोन्ही आयोजनाच्या माध्यमातून १२ हजार १५० खेळाडूंना विम्याचं कवच मिळणार आहे.

समन्वय समितीचं आवाहन

 • गोविंदांची सुरक्षितता राहण्यासाठी पथकांनी हेल्मेट सेफ्टी, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड आणि प्रोटेक्टरचा वापर करणं.
 • आयोजकांनी वरच्या थराला चढणाऱ्या गोविंदाचं ओळखपत्र तपासणं.
 • सुरक्षेचे नियम पाळणं.
 • पोलीस ठाण्यातून रीतसर परवानगी घेणं.
 • गोविंदा पथकांनी पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांना मदत करणं.

गोविंदा पथकांकडून मदत

 • जोगेश्वरी येथील प्रसिद्ध जय जवान पथकातील गोविंदांनी पूरग्रस्त भागांत जाऊन स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे.
 • विलेपार्लेच्या पार्लेश्वर स्पोर्ट्स क्लबनं २१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.
 • माझगावच्या श्री दत्त क्रीडा मंडळानं धान्य, वस्तू आणि कपडे अशा स्वरुपात पूरग्रस्तांना मदत केली.
 • चेंबूरच्या बालवीर गोविंदा पथकानं उत्सवातून जिंकलेल्या रकमेच्या २५ टक्के निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
 • हिंदू एकता मंच जोगेश्वरी या पथकानेही पूरग्रस्त भागांत वस्तूंच्या रुपात मदत केली आहे.
 • विलेपार्ले येथील पार्लेश्वर दहींहडी पथक उत्सवातून जमणारी सर्व रक्कम लष्कराला देणार आहे.हेही वाचा -

बेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदानRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा