Advertisement

राज्यातील रुग्णालयांतील विद्युत व अग्निशमन सुरक्षेचं तातडीनं परीक्षण करा - अजित पवार

राज्यातील रुग्णालयांतील विद्युत व अग्निशमन सुरक्षेचं तातडीनं परीक्षण करण्यात यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले आहेत.

राज्यातील रुग्णालयांतील विद्युत व अग्निशमन सुरक्षेचं तातडीनं परीक्षण करा - अजित पवार
SHARES

राज्यातील रुग्णालयांतील विद्युत व अग्निशमन सुरक्षेचं तातडीनं परीक्षण करण्यात यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले आहेत. मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या आजारासंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

शहरी भागातील कोरोना संसर्ग कमी होत असताना ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  बाधितांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात, खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकानं शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचं नियोजन करावं.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोरोना (covid 19) केंद्रे उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसंच, लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांचं पथक तयार ठेवण्यास त्यांनी सांगितल्याचं समजतं. राज्यात सुरू असणाऱ्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीला गती द्यावी. तसंच, प्रत्येक रुग्णालयात प्राणवायू वापराचं योग्य नियोजन करण्यात यावं.

मागील काही दिवसांपासून राज्यातील (maharashtra) कोरोना रुग्णांची (coronavirus) संख्या घटत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी राज्यात २४ हजार १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मंगळवारी ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के  आहे. तसंच राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा