Advertisement

‘या’ कारणांमुळे परळ येथील भोईवाडा विद्युत दाहिनी राहणार बंद

गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत दाहिनी आधारित सेवा ही नजीकच्या शिवाजी पार्क, शीव आणि रे रोड येथील स्मशानभूमीत सुरू राहणार आहे

‘या’ कारणांमुळे परळ येथील भोईवाडा विद्युत दाहिनी राहणार बंद
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणा-या भोईवाडा स्मशानभूमीतील 'विद्युत दाहिनी' ही देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी १४ सप्टेंबर  ते २३ सप्टेंबर  या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या १० दिवसांच्या कालावधी दरम्यान प्रामुख्याने मोडकळीस आलेल्या विद्युत दाहिनीची चिमणी बदलण्याच्या कामासह इतर आवश्यक कामे करण्यात येणार असल्यामुळे ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचाः- महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईच्या परळ येथे अनेक मोठ मोठी रुग्णालयं आहे. कोविड महामारीमुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशात कोविड मृतदेहाच्या संपर्कात आल्याने संक्रमण पसरण्याची शक्यता विद्युत दाहिनी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.  नाकारता येत नाही. त्यामुळे  परिसरातील रुग्णालयातील बहुतांश मृतदेह हे भोईवाडा  स्मशानभूमिच्या विद्युत वाहीनीवर दहन केले जात होते. मात्र मागील अनेक दिवसांपासून नादुरूस्त असलेली विद्युत दाहीनीची चिमणी मोडकळीत आली आहे. त्यामुळे पुढील १० दिवस या विद्युत दाहीनीची चिमणी दुरूस्तीचे काम सुरू राहणार असल्याने विद्युत दाहीनी बंद ठेवली जाणार आहेत. मात्र या कालावधीदरम्यान पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा सुरू राहणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. तसेच वरील कालावधीदरम्यान विद्युत दाहिनी आधारित सेवा ही नजीकच्या शिवाजी पार्क, शीव आणि रे रोड येथील स्मशानभूमीत सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा