Advertisement

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं.

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राजकारण यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे. त्याविषयी मी बोलेन पण आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन. पण माझं अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे.

यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर देखील भाष्यं केलं. कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.



हेही वाचा

Maratha Reservation : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा