Advertisement

तेजसमधील खाद्यपदार्थात कोणताही दोष नाही, तपासणीअंती उघड


तेजसमधील खाद्यपदार्थात कोणताही दोष नाही, तपासणीअंती उघड
SHARES

आमच्या जेवणामुळे प्रवाशांना विषबाधा झालीच नाही, हे आयआरसीटीसीने अखेर सिद्ध केले आहे. करमाळीहून मुंबईकडे येताना अत्याधुनिक ‘तेजस एक्सप्रेस’ मध्ये 26 प्रवाशांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. १५ ऑक्टोबरला हा प्रकार घडला. त्यामुळे प्रवाशांना चिपळूणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, आता या प्रकरणात रेल्वेत पुरवलेल्या खाद्यपदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून आला असून खाद्यपदार्थांत कोणताही दोष नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे.


नमुन्यांमध्ये कोणताही दोष आढळला नाही

तेजस एक्सप्रेस मुंबईत येत असताना 230 प्रवाशांपैकी 26 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याने चिपळूण येथे गाडी थांबवून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आयआरसीटीसीच्या कंत्राटदाराने पुरवलेले खाद्यपदार्थ कारणीभूत असावेत, असा प्राथमिक अंदाज होता. पण, तपासात सहप्रवाशांना उलटी झाल्याने त्याच्या वासाने इतरांनाही मळमळणं, उलट्यांचा त्रास सुरू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार, पदार्थांमध्ये दोष असल्यास तो कळावा म्हणून अन्नाचे नमुने मुंबईत महापालिकेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. पण, या नमुन्यांमध्ये कोणताही दोष नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

या प्रकारामुळे आयआरसीटीसीने दोन अधिकाऱ्यांना तपास सुरू असेपर्यंत निलंबित करून जेके घोष या कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा