सावरांच्या जिल्ह्यात सावळागोंधळ

  Mumbai
  सावरांच्या जिल्ह्यात सावळागोंधळ
  मुंबई  -  

  पालघर - आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या जिल्ह्यात सध्या सावळागोंधळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्याची नव निर्मिती होऊन बराच कालावधी लोटला तरी शासकीय आस्थापना पदे अजून सक्षम झाली नसल्याचे चित्र आहे. आजही बहुतेक तालुक्यात अधिकारी वर्ग प्रभारीपद भूषवत आहे, आणि तेही जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या विष्णू सावरा यांच्या मतदार संघात. या सर्व प्रकारामुळे जनतेच्या कामांना मात्र उशीर होत आहे.

  पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यात महसूल आणि ग्रामविकास खात्याचे अधिकारी दुसऱ्या तालुक्याचे प्रभारीपद सांभाळत आहेत. त्यामुळे शासकीय कामांसाठी जनतेला वारंवार खेटे मारावे लागत आहेत. कामंही होत नाहीत आणि अधिकाऱ्यांचे दर्शनही नाही अशी परिस्थिती सध्या पालघर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून जव्हारचे तहसीलदार रजेवर गेल्याने वाडा तहसीलदार हे तेथील काम पाहत आहेत. तर वाडा येथील गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाल्याने येथे तहसीलदाराचा पदभार गटविकास अधिकारी सांभाळत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मतदारसंघ आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्याला चांगलंच उचलून धरलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.