Advertisement

पुरेशा पाण्यासाठी मुंबईकरांना ४ वर्ष वाट पहावी लागणार

पिंजाळ आणि गारगाई प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुढील चार वर्षात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळेल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

पुरेशा पाण्यासाठी मुंबईकरांना ४ वर्ष वाट पहावी लागणार
SHARES

मुंबईकरांना पुरेश्या पाण्यासाठी अजून चार वर्ष वाट पहावी लागणार आहे. कारण मुंबईला पुरेसे पाणी मिळावी यासाठी उभारल्या जाणाऱ्या पिंजाळ आणि गारगाई प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुढील चार वर्षात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळेल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा गुरूवारी महापौरांनी घेतला.

 स्वच्छ सुरक्षित मुंबई आणि चांगले रस्ते याचा संकल्प नवीन वर्षात केला आहे. या संकल्पानुसार शहरात काय करता येईल याबाबत आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिकेचे सुरू असलेले अर्धवट असलेले तसेच पुढे होऊ घातलेल्या प्रकल्पांची माहिती घेतल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधली जात आहेत. त्यापैकी गारगाई धरणाचे काम अर्ध्यापर्यंत झाले. तर, पिंजाळ प्रकल्पासाठी ग्राम पंचायत स्तरावर ठराव घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा ः- बेस्ट खरेदी करणार ५० दुमजली बस


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा