ओपन जिम नेमकी कुणासाठी?

 Lower Parel
ओपन जिम नेमकी कुणासाठी?
ओपन जिम नेमकी कुणासाठी?
ओपन जिम नेमकी कुणासाठी?
ओपन जिम नेमकी कुणासाठी?
See all

लोअर परळ - लोअर परळमधील तुळसी पाइपलाइन इथल्या ओपन जिमचा वापर अनधिकृत फेरीवाले आणि पार्किंगसाठी होत असल्याचं समोर आलंय. आमदार सुनील शिंदे यांच्या निधीतून ही ओपन जिम बांधण्यात आली होती. मात्र ही ओपन जिम आता अनधिकृत फेरीवाल्यांचा अड्डा बनलीय. व्यायाम करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी, लहान मुलांच्या स्कूल बस थांब्यासाठी या जागेचा विकास करण्यात आला होता. मात्र या जागेवर फेरीवाले, चहाच्या टपऱ्या आणि त्यांच्या ग्राहकांची सतत गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे ही ओपन जिमची जागा नेमकी कुणासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. विशेष म्हणजे स्थानिक आमदार आणि महापालिका या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं अक्षय आंबेकर यांनी मुबई लाइव्हला सांगितलं.

Loading Comments