Advertisement

जगन्नाथ भातणकर मार्ग बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक

वरळी- शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे (Worli-Shivdi flyover) काम लवकरच सुरू होणार आहे.

जगन्नाथ भातणकर मार्ग बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक
SHARES

वरळी- शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे (Worli-Shivdi flyover) काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण (mmrda)च्या माध्यमातून वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती एमएमआरडीएच्या वतीनं देण्यात आली आहे.

हा मार्ग बंद करण्यात आल्यानं पर्यायी व्यवस्था म्हणून, एलफिन्स्टकडूनन (Elphinstone) प्रभादेवी, वरळीकडे येणारी वाहतूक दीपक टॉकीजवरून पुन्हा वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेनं वळवण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी एलफिन्सनवरून प्रभादेवीला येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असला तरी आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिकेसाठी एक विशेष मार्गिका ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिके व्यतिरिक्त हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

लवकरच वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे काम सुरू होत आहे. काम सुरू असताना काही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा लक्षात घेता रुग्णवाहिकेसाठी येथून एक विशेष मार्गिका तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या वतीने देण्यात आली आहे.

वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलासाठी सात खांबांची निर्मिती करण्यात येणार आहे. सात खांबावर हा संपूर्ण पूल उभारण्यात येणार असल्याचं एमएमआरडीनं म्हटलं आहे.



हेही वाचा

मुंबईतील रस्त्यांची स्थिती चांगली- उच्च न्यायालय

मुंबईतील 'हे' मार्केट अमेरिकेच्या कुप्रसिद्ध बाजारांच्या यादीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा