Advertisement

जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तोडगा काढण्याचं आश्वासन

जेट एअरवेजच्या प्रश्नावर तोडगा काढावा या मागणीसाठी 'जेट'च्या विविध आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तोडगा काढण्याचं आश्वासन
SHARES

 जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याने जेटच्या २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं जेट एअरवेजच्या प्रश्नावर तोडगा काढावा या मागणीसाठी 'जेट'च्या विविध आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचं समजतं आहे.  


प्रश्नांवर मार्ग

जेट एअरवेजच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी भारतीय कामगार सेनेनं आंदोलन केलं होतं. त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजमधील विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचत यातून मार्ग काढण्याची विनंती केली. यावर उद्धव ठाकरेंनी 'जेट एअरवेजच्या कामगारांची रोजीरोटी वाचलीच पाहिजे', असं सांगत 'नव्या केंद्र सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आपण यासंदर्भात पंतप्रधान, अर्थमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू' असं आश्वासन दिलं.  


तोडगा निघणार का ?

यावेळी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, संतोष चाळके, संजय कदम, गोविंद राणे आदी उपस्थित होते. मात्र, नव्या केंद्र सरकारचा शपथविधीनंतर जेटच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे चर्चा करणार का याकडं सर्व कामगारांचं लक्ष लागून राहिलं आहे.



हेही वाचा -

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एमएमआरडीए १० बूम लिफ्टस् ट्रक खरेदी करणार

प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन नोंदणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा