Advertisement

मुंबईत लवकरच उभारणार ज्वेलरी पार्क

मुंबईसह असे ज्वेलरी पार्क दिल्ली, बंगळुरुसारख्या शहरांमध्ये देखील उभारण्यात येणार आहेत.

मुंबईत लवकरच उभारणार ज्वेलरी पार्क
SHARES

मुंबईसह देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लवकरच ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. ज्वेलरी निर्यात वाढावी आणि भारतीय ज्वेलरीला आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उभारण्यात येणाऱ्या पार्कमध्ये १०० हून अधिक ज्वेलरीची दुकानं असतील. याशिवाय पार्कमध्ये ज्वेलरी बनवण्यासाठी मशीनची सोय देखील असेल. जेणेकरून पार्कमध्येच ज्वेलरीची हवी ती डिझाईन बनवून दिली जाईल.

मुंबईसह असे ज्वेलरी पार्क दिल्ली, बंगळुरुसारख्या शहरांमध्ये देखील उभारण्यात येणार आहेतजेम्स अॅण्ड ज्वेलरी क्षेत्रातील निर्यात २०२५ पर्यंत ७५ अरब डॉलरपर्यंत पोहचवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. याशिवाय या क्षेत्रात २५ लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. मुंबईमध्ये बनवण्यात येणाऱ्या पार्कमध्ये २००० हून अधिक ज्वेलरीची दुकानं एकाच छताखाली असतील. याशिवाय ज्वेलरी डिझाईनसोबतच ज्वेलरीची शुद्धता तपासण्यासाठी लागणारे आत्याधुनिक मशीन्स देखील असतील. ज्वेलरी पार्कच्या उभारणीनंतर निर्यातीत ६ ते ८ अरब डॉलर इतक्या वाढीची अपेक्षा आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा