Advertisement

त्या 'क्लब'चं बांधकाम अनधिकृत, मे महिन्यात झाली होती कारवाई


त्या 'क्लब'चं बांधकाम अनधिकृत, मे महिन्यात झाली होती कारवाई
SHARES

लोअर परळ इथल्या कमला मिल परिसरात असलेल्या वन अबव्ह या क्लबला गुरुवारी रात्री १२.३० वाजता भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.


क्लबचं बांधकाम अनधिकृत

मोकळया जागेचा अनधिकृत वापर करत कमला मिलमधील वन अबव्ह या क्लबचं बांधकाम करण्यात आलं. यापूर्वी कारवाई करत हे बांधकाम तोडण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही ते पुन्हा उभारण्यात आलं. पण त्यानानंतरही या जागेचा वापर करू नका यासंदर्भात महापालिकेच्याने नोटीस पाठवूनही याची दखल घेतली नाही. परिणामी या दुर्घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.


कारवाई होणार

कमला मिलमधील वन अबव्ह या क्लबमधील आगीच्या दुर्घटनेनंतर या परिसरातील सर्वच कार्यालयाची तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्यांचे अनाधिकृत आणि वाढीव तसेच नियमबाह्य बांधकाम झाल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जी/ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी मुंबई लाईव्हशी बोलतांना दिली.


कारवाईनंतरही वाढीव बांधकाम

वन अबव्ह या क्लबकडे हॉटेलचा परवाना आहे, पण आग लागली त्या मोकळ्या जागेचा ते अनाधिकृत वापर करत होते. त्यामुळे २७ मे २०१७ला या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या जागेचा वापर त्यांच्याकडून सुरू होता. त्यामुळे ४ ऑगस्ट २०१७, त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी तसंच २७ ऑक्टोबरला नोटीस देऊन या मोकळ्या जागेचा वापर बंद करण्यात यावा, असं कळवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा