मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. लॉकडाऊन लागू असलं तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांदिवली इथल्या एका मंदिराच्या कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सांस्कृतिक स्थळांमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
कांदिवली पूर्व इथल्या साईधाम मंदिरातल्या १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या सर्व कर्मचार्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याशिवाय या कर्मचार्यांच्या संपर्कात येणार्या सर्व लोकांचा शोध घेतला जात आहे.
लॉकडाऊन दरम्यान अनेक गरजू आणि गरीब कुटुंबाला एक वेळचं जेवण देखील मिळेनासं होत आहे. यामुळे साईधाम मंदिरातील हे १२ कर्मचारी गरीब व गरजू लोकांना अन्न वाटण्याचं काम कर होते.
कांदिवली पूर्वेकडील साईधाम मंदिर हे खूप मोठे मंदिर मानले जाते. लॉकडाऊन होण्यापूर्वी दररोज हजारो भाविक या मंदिरात जात असत. पालिका सध्या या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये पाठवून पुढिल तपास करत आहे.
दरम्यान गुरुवारी, मुंबईत कोरोनाचे ९९८ रुग्ण आढळले. जे आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. तर त्याच दिवशी मुंबईत २५ कोरोना रुग्णांचा मत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा ६२१ वर पोहोचला.
राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या एकूण २७ हजारांवर पोहोचली आहे. मुंबईत, तर संक्रमित रुग्णांचा आकडा १६ हजार ७३८ च्या घरात गेला आहे.हेही वाचा