Advertisement

COVID 19 रुग्णांसाठी मुंबईतल्या ७२ बसेसचे अॅमब्युलंसमध्ये रूपांतर

जवळपास ७२ बेस्टच्या बसेसचं रूग्णवाहिकांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत.

COVID 19 रुग्णांसाठी मुंबईतल्या ७२ बसेसचे अॅमब्युलंसमध्ये रूपांतर
SHARES

मुंबईमध्ये १५० रुग्णवाहिकांची भर पडली आहे. ज्या सध्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट आहेत. या रुग्णावहिका COVID 19 बाधित रुग्णांना घेऊन जाण्यासाठी आहेत. यासाठी जवळपास ७२ बेस्टच्या मिनी बसेसचं रूग्णवाहिकांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर करण्याच्या निर्णय घेण्यात आला. बेस्टला या बसेस आठवड्याच्या अखेरीस सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

बेस्टनं सुधारित रूग्णवाहिकांच्या नवीन ताफ्यात ऑक्सिजन सिलिंडर आणि जीवन-समर्थन प्रणालीसह दोन बस स्थापित केल्या आहेत. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांना आणि संशयित रुग्णांना नेण्यासाठी MEMSच्या ६६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता होती. यामुळे रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तासंतास प्रतिक्षा करावी लागत होती. अंधेरी पश्चिम इथल्या नगरसेविका अल्पा जाधव यांनी माध्यमांना सांगितलं की, रुग्णवाहिका COVID 19 पर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेला २-३ तास लागतात. कारण ड्रायव्हर आणि मदतनीस प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिका स्वच्छ करतात. त्यानंतर पुन्हा रुग्णवाहिकेतील वैयक्तिक संरक्षक उपकरणे लावावी लागतात. यासाठी अधिक वेळ लागतो.

राज्य सरकारनं ३० एप्रिल रोजी एका अधिसूचनेमध्ये पालिकेच्या आपत्ती कक्षाला COVID 19 रुग्णांसाठी रुग्णवाहिका एकत्रित करण्याचा अधिकार दिला होता. सेल एमईएमएस रुग्णवाहिकांसह स्वतःच्या रुग्णवाहिकांचा ताफा देखील हाताळत आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “आम्ही बेस्टला सुधारण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला आहे. यासोबतच स्ट्रेचर देखील जोडण्यास सांगितलं आहे. सोमवारपासून आमच्याकडे १५० रुग्णवाहिका आहेत. यात मिनी बस, बेस्ट बस आणि नियमित रुग्णवाहिकांचा समावेश आहे.”

मिनी वातानुकूलित बसमध्ये, शेवटच्या सिटचं स्ट्रेचरमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. याउलट, ड्रायव्हरच्या आसन क्षेत्रास अल्युमिनियम शीट्सचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून ड्रायव्हरला कोरोनाव्हायरसची लागण होऊ नये. महाराष्ट्रात सध्या कोरोनाव्हायरसची २७ हजार ५५४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी मुंबईतले १६ हजार ७६८ रुग्ण आहेत.



हेही वाचा

Coronavirus Updates : १ लाख मजुरांचा एसटीतून प्रवास

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते कॉमन मोबिलिटी कार्ड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा