Advertisement

coronavirus updates : १ लाख मजुरांचा एसटीतून प्रवास

एसटीनं राज्याच्या विविध भागांतील १ लाख ६ हजार २४ परप्रांतिय मजूर, कामगारांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे.

coronavirus updates : १ लाख मजुरांचा एसटीतून प्रवास
SHARES

राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार गेल्या ६ दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने राज्याच्या विविध भागांत अडकलेले १ लाख ६ हजार २४ परप्रांतीय मजूर, कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवलं आहे.

सेवा मोफत

एसटीच्या हजारो चालकांनी ७ हजार २२७ बसच्या माध्यमातून ही सेवा दिली. ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर येथील बस आगारातून या बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करीत चाललेल्या परप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना गाडीत बसवून गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटक राज्यांच्या सीमेपर्यंत त्यांना सोडण्यात आलं. टाळेबंदी संपेपर्यंत अशीच सेवा एसटी महामंडळाकडून दिली जाणार आहे. ही सेवा मोफत असून राज्य शासनाकडून याचे पैसे भरले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

अशा प्रकारे गेल्या ३ दिवसांत २१ हजार ७१४, तर ६ दिवसांत १ लाख ६ हजार २४ मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात एसटी प्रशासन यशस्वी झालं आहे.

सुरक्षित प्रवास करा

भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना एसटी बस मध्ये बसवून, सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात, एसटी कर्मचारी मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. असे कौतुगोद्गार अॅड. परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल काढले.

याच बरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचं पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लाॅकडाऊन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचं व तिथं अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहीम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तरी त्यांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता, एसटी बसमधूनच सुरक्षित प्रवास करावा, असं आवाहन अॅड.अनिल परब यांनी केलं आहे.

दरम्यान, शासनाकडून एसटीला २५० कोटी रुपये इतकी रक्कम सवलतीची प्रतीपूर्ती म्हणून मिळणार असून त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या एसटीचा एका महिन्याच्या वेतनाचा तिढा सुटलेला आहे.




हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याची शक्यता

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्या रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा