Advertisement

'देवा बाबांची काळजी घे', पोलिसाच्या मुलीचं भावनिक पत्र!

एका पोलिसाच्या मुलीनं ‘बाबांसह महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत, देवाला त्यांची काळजी घे,’ असे लिहिलेले ग्रिटिंग तयार केले आहे.

'देवा बाबांची काळजी घे', पोलिसाच्या मुलीचं भावनिक पत्र!
SHARES

कोरोना व्हायरसनं मुंबईसह राज्याला विळखा घातला आहे. अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्यानं मोठ्या वेदना सोसाव्या लागत आहेत. अशातच राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी तसंच, त्याच्याविरोधात लढा देण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अगदी आपला जीव धोक्यात घालून कार्य बजावत आहेत. त्यामुळं काही पोलीसांच्या कुटुंबात नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, या कुटुंबातील लहान मुल 'बाब नका जाऊ' असं सांगतं आहेत, तर काही मुलं 'देवबाप्पा बाबावर लक्ष असूदे' अशी प्रार्थना करत आहेत.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे पोलिसांवरचा ताण वाढत आहे. आपल्यामुळं कुटुंबीयांना त्रास नको म्हणून भीतीही वाढत आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाच्या मुलीनं ‘बाबांसह महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत, देवाला त्यांची काळजी घे,’ असे लिहिलेले ग्रिटिंग तयार केले आहे.

मुंबई पोलीस दलातील मनेश कदम यांच्या मुलीनं पोलीसांटी ग्रटींग तयार केलं आहे. 'आमच्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या बाबासह महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानत पोलिसाची मुलगी असल्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगते. ‘देवा त्यांच्यावर लक्ष असूदेत. त्यांची काळजी घे, अशा आशयाचे ग्रिटिंग तयार करत त्यावर वडिलांचा फोटो चिकटवला'. या मुलीनं लिहीलेलं हे ग्रिटिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण होत असून, १०९६८ जण होम क्वारंटाइन आहे. अशांवर नजर ठेवण्याबरोबरच विविध बंदोबस्तांची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. मुंबईत १४६ ठिकाणे सील करण्यात आली आहेत. या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना घरी जाण्याचीही भीती वाटते. 



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा