Advertisement

तानसा जलवाहिनी लगतच्या रहिवाशांची फरफट सुरूच


तानसा जलवाहिनी लगतच्या रहिवाशांची फरफट सुरूच
SHARES

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तानसा जलवाहिनी लगतच्या १० किमी परिसरातील झोपडपट्ट्या हटवून महापालिकेने घाटकोपरमधील ४०० कुटुंबीयांचे स्थलांतर कुर्ल्यातील कोहिनूर इमारत क्र. ७ मध्ये केले आहे. हे स्थलांतरीत रहिवासी नव्या घरांत स्थिरावत असतानाच महापालिकेने ७ महिन्यांच्या आत या रहिवाशांना पुन्हा माहुल येथे स्थलांतरीत होण्याची नोटीस पाठवली आहे.

महापालिकेच्या कारवाईला पूर्णपणे सहकार्य करून देखील इथून तिथे फरफट सुरूच असल्याने हे स्थलांतरीत रहिवासी वैतागले आहेत. त्यामुळे या रहिवाशांनी गुरूवारी कुर्ल्यातील राम देवपीर मार्ग, गावदेवी रोड, किरोळ रोड आणि हवेली पूल मार्गे घाटकोपरच्या एन वॉर्ड ऑफिसपर्यंत मोर्चा काढत महापालिकेचा निषेध नोंदवला.



निवडणूक जिंकण्यासाठी फसवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २९ नोव्हेंबर रोजी रहिवाशांना या घरांचे चावी वाटप करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० नोव्हेंबर रोजी तानसा जलवाहिनी लगतच्या घरांवर कारवाई करण्यात आली.


महापालिका निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून न दिल्यास आम्ही तुम्हाला माहुलमध्ये पाठवू, अशी धमकी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी रहिवाशांना दिली होती. मात्र या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पराग शहा विजयी होऊन देखील आम्हाला माहुल येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे.
- अमित पवार, रहिवासी, कोहिनूर इमारत


तानसा जलवाहिनी परिसरातील स्थलांतरीतांना जेव्हा चावी वाटप करण्यात आली. तेव्हा मी भाजपाचा सदस्य नव्हतो. त्यामुळे कुणी काय आश्वासन दिले, ते मला माहीत नाही. आमच्या पक्षातील सदस्यांनी रहिवाशांना घरांचे आमिष दाखवून मतदान करायला कधीच सांगितले नाही.

- पराग शहा, नगरसेवक, भाजपा






सहाय्यक आयुक्तांचे आश्वासन

कोहिनूर इमारत क्र.७ मधील सुधाकर वाडकर, अमित खरात, जोगिंदर बोहित, संतोष पवार आणि सुभाष खुरगळे अशा पाच सदस्यांनी एन वॉर्ड ऑफिसच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांची भेट घेऊन सर्व रहिवाशांच्या मागण्या मांडल्या. या मागण्या महापालिका आयुक्तापुढे मांडण्यात येतील, असे आश्वासन एन वॉर्ड साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिले.




नोटिशीविरोधात न्यायालयात

महापालिकेने रहिवाशांना माहुलमध्ये स्थलांतरीत होण्यासाठी पाठवलेल्या नोटिशीविरोधात रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ४ ऑगस्टला न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, एन वॉर्ड आयुक्त नरेंद्र बर्डे, सहाय्यक आयुक्त सुधांशू त्रिवेदी या सर्वांविरोधात कोहिनूर इमारतीतील रहिवाशी पोलीस तक्रार नोंदवणार आहेत.



हे देखील वाचा -

वांद्रे दुर्घटनेतील पी़डितांना नुकसान भरपाई द्या, स्थायी समितीची मागणी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा