Advertisement

लाॅकडाऊनमध्येही ८ हजार ६४० टन आंब्याची निर्यात

लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असतानाही कृषी विभागामार्फत कोकणातील ८ हजार ६४० मेट्रीक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.

लाॅकडाऊनमध्येही ८ हजार ६४० टन आंब्याची निर्यात
SHARES

लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असतानाही कृषी विभागामार्फत कोकणातील ८ हजार ६४० मेट्रीक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. १ एप्रिल ते १९ मे २०२० या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आलं व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण २ लाख ९९ हजार ९५० मे. टन मालाची निर्यात करण्यात आली आहे. 

जगभरात निर्यात

राज्यात कोरोनाविरुध्द लढाई सुरु असताना शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या.  यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचे संकट दूर करण्यासाठी कृषी माल निर्यात सुरळीत ठेवण्यात यश आले. या परिस्थितीत कृषी विभागाने जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामार्फत भारतातील फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. 

मागील दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्यांची निर्यात करण्यात आली आहे. आंबा ८ हजार ६४० मे.टन, केळी ३३ हजार ९४८ मे. टन, द्राक्ष्‍ो ९ हजार ५०९ मे. टन, डाळिंब १ हजार ७७३ मे. टन, कांदा २ लाख २५ हजार ६८६ मे.टन,  लिंबू ६५३ मे.टन, मिरची १ हजार ५२२ मे. टन, आले १ हजार १६८ मे. टन, इतर फळे व भाजीपाला १७ हजार ०५१ मे.टन  निर्यात करण्यात आले.

हेही वाचा - 'इतके' हजार टन डाळिंब निर्यात घटली

इतकी झाली वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत केळी, लिंबू, मिरची आणि आले याची निर्यात यावर्षी जास्त झालेली आहे. यामध्ये केळी गेल्या वर्षी २३ हजार ४५६ मे.टन तर यावर्षी ३३ हजार ९४८ मे.टन निर्यात झाली आहे. म्हणजेच केळी निर्यात सुमारे दीडपट झालेली आहे. लिंबाची निर्यात गेल्या वर्षी २८३ मे.टन होती. यावर्षी ६५३ मे.टन झाली आहे. मुंबईमधून गेल्यावर्षीच्या तुलनेत लिंबू निर्यात २३० टक्के झालेली आहे. हिरव्या मिरचीची निर्यात गेल्या वर्षी १ हजार ४०९ मे.टन झाली होती. त्या तुलनेत यावर्षी १ हजार ५२२ मे.टन म्हणजे सुमारे ११३ मे.टन जास्त झाली आहे. तसेच आल्याच्या निर्यातीतही चांगली वाढ झालेली असून गेल्यावर्षी आले निर्यात  ८४६ मे.टन होती. यावर्षी १ हजार १६८ मे.टन झालेली आहे.

कौतुकास्पद कामगिरी

मागील वर्षाच्या निर्यातीच्या तुलनेत यावर्षीची निर्यात कमी झालेली असली, तरी कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथून कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसंच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतानाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणं हे कौतुकास्पद आहे. पुढील काळात या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा