कुर्ला पुलावर लागले ध्वनिरोधक

 Kurla
कुर्ला पुलावर लागले ध्वनिरोधक
कुर्ला पुलावर लागले ध्वनिरोधक
कुर्ला पुलावर लागले ध्वनिरोधक
कुर्ला पुलावर लागले ध्वनिरोधक
See all

कुर्ला - कुर्ला पूर्व परिसरातील पुलावर एमएमआरडीएकडून ध्वनिरोधक (नॉइस बॅरियर) लावण्यात आलेत. त्यामुळे वाहनांच्या रहदारीचा आवाज कमी होण्यास मदत तर होईलच, पण पुलावरून वस्तू फेकल्या जाण्याचा प्रकारही थांबेल म्हणून रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. या पुलावर बसून किंवा गाड्या थांबवून दारू पिऊन दारूडे रिकाम्या बाटल्या खाली फेकत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. काही महिन्यांपासून रहिवासी हा त्रास सहन करत होते. एक रहिवासी जमशेद खान यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच अशी एक बाटली खाली फेकण्यात आली होती. सुदैवानं ती कुणाला लागली नाही. अशी बाटली एखाद्याच्या डोक्यात पडली, तर जीव धोक्यात येऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Loading Comments