Advertisement

जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबईत जागेची कमतरता

मागील ३ महिन्यांत तब्बल १०४ टक्क्यांनी वाढले आहे.

जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबईत जागेची कमतरता
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा उपचारावेळी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील ३ महिन्यांत तब्बल १०४ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे जैविक विल्हेवाटीसाठी मुंबईत जागेची कमतरता जाणवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि देवनार कचराभूमीवर जैविक कचऱ्यासाठी राखीव १ एकर जागेवरील ताण वाढला आहे.

देवनार कचराभूमीवर दररोज येणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी एसएमएस एन्वोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आहे. रुग्णालयातून जैविक कचरा गोळा करण्यासाठी या कंपनीकडे ६० वाहने आहेत. तसेच मुंबईतील बाधित क्षेत्र, कोविड सेंटरमधून महापालिकेच्या ३५ वाहनांतून पिवळ्या पिशवीतून जैविक कचरा कचराभूमीवर आणला जातो. मात्र आता दररोज जैविक कचऱ्याचं सरासरी प्रमाण २४ हजार ८८० किलोग्रॅम गेल्यामुळे ताण वाढला आहे.

महापालिका रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रमाण मागील ३ महिन्यांत तब्बल १०४ टक्क्यांनी वाढलं आहे. जून महिन्यात सरासरी १२ हजार किलोग्रॅम असलेल्या जैविक कचऱ्याचा भार ऑगस्टमध्ये प्रतिदिन सरासरी २४ हजार ८८० किलोग्रॅमवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून मास्क, ग्लोव्हज, औषध सिरिंज, सलाइन बॉटल, युरीन बॅग अशा प्रकारच्या जैविक कचऱ्याचं प्रमाण देवनार कचराभूमीवर वाढलं आहे.

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमावलीनुसार रुग्णालय व अन्य आरोग्य यंत्रणेकडून आलेला हा प्लॅस्टिकचा कचरा लाल पिशवीमध्ये वेगळा ठेवावा लागतो. त्यानंतर प्रत्येक पिशवीचं निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट अथवा प्रक्रियेसाठी पाठवली जाते. मात्र जैविक कचऱ्याचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळं वाहनांची संख्या आणि हा कचरा ठेवण्यासाठी देवनार कचराभूमीवर जागाही कमी पडू लागली आहे.

मास्क, ग्लोव्हज, औषध, सिरिंज, युरीन बॅग, वैद्यकीय कर्मचाºयांनी वापरलेले पीपीई किट आदी जैविक कचरा पिवळ्या पिशवीत एकत्रित करून त्यावर धोक्याचं चिन्ह दर्शवण्यात येते. कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील सर्व जैविक कचरा त्यानंतर देवनार कचराभूमीवर विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात येतो. तसंच कोविड केअर सेंटरमधील अन्य वापरलेल्या वस्तू उदा. अन्न आदी देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये स्वतंत्र ठिकाणी टाकून त्यावर सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात येते.



हेही वाचा -

'या' मंडळांच्या मूर्तीचेच विसर्जन होणार समुद्रात

मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा