Advertisement

'या' मंडळांच्या मूर्तीचेच विसर्जन होणार समुद्रात

मंगळवारी अनंत चतुर्दशी असून, चौपाटीनजीक असलेल्या गणेश मंडळांना समुद्रात विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे.

'या' मंडळांच्या मूर्तीचेच विसर्जन होणार समुद्रात
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा समुद्रात गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक भक्तांना परवानगी नाही. राज्य सरकार व महापालिकेनं जारी केलेल्या नियमावलीनुसार, साधेपणानं गणेशोत्सव साजरा करायचा असल्यानं कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. दीड, ५ व ७ दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन या कृत्रिम तलावांमध्येच करण्यात आलं. परंतु, मंगळवारी अनंत चतुर्दशी असून, चौपाटीनजीक असलेल्या गणेश मंडळांना समुद्रात विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, चौपाटीपासून दूर राहणाऱ्या भाविकांना व मंडळांना समुद्रात विसर्जनाची परवानगी नाही.

गिरगाव, दादर, जुहू चौपाटीपासून दूर राहणाऱ्या भाविकांना, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या विभागातील महापालिकेच्या कृत्रिम तलावात अथवा मंडपातच व्यवस्था करून विसर्जन सोहळा उरकावा लागणार आहे. त्यांना चौपाटीवर जाता येणार नाही. कोरोनाच्या संसर्गामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी महापालिकेनं मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव, फिरते कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध केली आहेत.

चौपाटीपासून २ किलोमीटर अंतराच्या आत राहणाऱ्यांनाच चौपाटीवर विसर्जनाची परवानगी आहे. गणेश विसर्जनासाठी यंदा महापालिकेनं नोंदणी बंधनकारक केली होती. महापालिकेच्या काही प्रशासकीय विभागांच्या हद्दीत चौपाटी आहे. केवळ याच विभागांच्या हद्दीतील गणेशमूर्तीचं चौपाटीवर विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

यंदा केवळ गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मरिन लाइन्स, चिराबाजार आणि आसपासच्या परिसरातील गणेशमूर्तीना गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यास परवानगी आहे. विसर्जन नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या अ‍ॅपवर तसा पर्याय देण्यात आला आहे. मात्र अन्य विभागांतील अ‍ॅपवर चौपाटीचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला नाही.



हेही वाचा -

गणेशभक्त १० दिवसांच्या बाप्पाला देणार निरोप

मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा