Advertisement

गणेशभक्त १० दिवसांच्या बाप्पाला देणार निरोप

बाप्पाच्या विसर्जनावेळी मुंबईवर आलेलं कोरोनाचं संकट दुर करण्यासाठी साकडं घालत बाप्पाला निरोप देणार आहेत.

गणेशभक्त १० दिवसांच्या बाप्पाला देणार निरोप
SHARES

आपल्या लाडक्या गणरायाला मंगळवारी लाखो गणेशभक्त भावपूर्ण निरोप देणार आहेत. या वर्षी चौपाट्यांवर प्रवेश बंदी असल्यानं, गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेचा २३ हजार कर्मचाऱ्यांचा ताफा ४४५ स्थळी सज्ज झाला आहे. त्याशिवाय, बाप्पाच्या विसर्जनावेळी मुंबईवर आलेलं कोरोनाचं संकट दुर करण्यासाठी साकडं घालत बाप्पाला निरोप देणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियमावलीनुसार मुंबईकरांनीगणेशोत्सव साध्या पद्धतीने व शांततेत साजरा केला. दीड, ५ आणि ७ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन प्राधान्याने कृत्रिम तलावांमध्ये भाविकांनी केले. मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिका सतर्क आहे. यासाठी १६८ कृत्रिम तलाव संख्या, १७० मूर्ती संकलन केंद्र , ३७ फिरती विसर्जन स्थळे तर ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार केली आहेत.

  • सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरती विसर्जन स्थळांची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
  • गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकारी-कर्मचारी यांची संख्या तिप्पट करण्यात आली आहे.
  • नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जनास मनाई आहे.
  • मुंबई पोलीस शहरातील सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं संपूर्ण शहरावर नजर ठेवतील.
  • मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी, कर्मचाºयांच्या मदतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल आदी तैनात असतील.
  • सर्व पोलीस ठाण्यांतील कर्मचाºयांना हद्दीतील संवेदनशील ठिकाणांवर, विसर्जन पॉइंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५४ रस्ते बंद, तर ५६ रस्त्यांवर एकेरी वाहतूक : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील ५४ रस्ते बंद राहतील. हे निर्बंध बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील. करी रोड आणि चिंचपोकळी उड्डाणपुलावर १६ टनपेक्षा जास्त वाहतुकीला परवानगी नाही. हे नियम १४ रेल्वे पुलांसाठीही लागू आहेत.

५६ रस्त्यांवर एकेरी वाहतूक, तर ९९ ठिकाणी पार्किंगला बंदी असेल. व्हीपी रोड, गिरगाव रोड (प्रिन्सेस स्ट्रीट ते एसव्हीपी मार्ग), सँडहर्स्ट रोड (मरिन ड्राइव्ह जंक्शन ते ऑपेरा हाउस, प्रार्थना समाज), सीएसटी जंक्शन ते मेट्रो सिनेमा, ग्रँट रोड पुलाच्या दोन्ही बाजू, एलबीएस मार्ग (टँक रोड जंक्शन ते शिवाजी तलाव), खोदादाद सर्कल ते कोतवाल उद्यान, भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंड ) आदी काही महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.

चौपाट्यांवरील व्यवस्था

  • स्टील प्लेट - ८९६
  • नियंत्रण कक्ष -७८
  • जीवरक्षक - ६३६
  • मोटर बोट -६५ 
  • प्राथमिक उपचार केंद्र - ६९

या सुविधाही उपलब्ध :

  • रुग्णवाहिका - ६५
  • स्वागतकक्ष - ८१
  • तात्पुरती शौचालये - ८४
  • निर्माल्य कलश - ३६८
  • फ्लड लाईट - २७१७
  • निरीक्षण मनोरे - ४२
  • जर्मन तराफा -४५
  • मनुष्यबळ (कर्मचारी) - १९५०३
  • अधिकारी - ३९६९



हेही वाचा - 

मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू

पत्रकार महिलेला अश्लील मेसेज, आरोपी गजाआड


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा