Advertisement

मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

विसर्जन ठिकाणी गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. पण त्यानंतरही खबरदारी म्हणून पाच हजार सीसीटीव्हींसह बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
SHARES

मुंबईत यंदा कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सव जरी साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला असला. तरी शेवटच्या दिवशी उत्सवाला गालबोट लागू नये. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यादृष्टीकोनातून मुंबई पोलिसांनी मंगळवारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात ३५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदबस्त मुंबईत ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांच्या मदतीने विसर्जनाचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 हेही वाचाः- पत्रकार महिलेला अश्लील मेसेज, आरोपी गजाआड

आधीच कोरोना काळात मुंबईच्या रस्त्यांवर २४ तास ड्युटी करून कंटाळलेल्या मुंबई पोलिसांसमोर गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र आले. मात्र पोलिसांनी दोनही सणांच्या सुरक्षेचा शिवधनुष्य अपेक्षेप्रमाणे पेलला. आता अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिस सज्ज झाले असून  मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यंदा अनेक गणेश मंडळांनी कोरोना संकट काळात अनेक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी उत्सव साध्या पणात साजरा केला. त्यामुळे विसर्जन ठिकाणी गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. पण त्यानंतरही खरदारी म्हणून पाच हजार सीसीटीव्हींसह बंदोबस्त ठेवण्या येणार आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू

 पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, फोर्स वन, रॅपिड ऍक्‍शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक राखीव ठेवण्यात आली आहे. होमगार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकायांची मदत घेण्यात येणार आहे. विसर्जन ठिकाणं व त्याठिकाणच्या परिसरात ३५ हजार पोलिसांच्या मदतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एक हजार अतिरिक्त पोलिस, रॅपिड अॅक्शन फोर्सची एक कंपनी, तीन राज्य राखील पोलिस दलाच्या कंपन्या असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चार फुट व घरगुती गणपती दोन फुट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणांवर गर्दी होऊ नये, यासाठी १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे उभारण्यात आली आहेत. नागरीकांना रस्त्यावर गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिन्ग पाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विसर्जनाच्या ठिकाणी जलतरणपटू, स्वयंसेवी यांचीही मदत घेण्यात येणार आहे.खरदारीचा उपाय म्हणून तटरक्षक व नौदलाच्या बोटीही तैनात करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा