Advertisement

हल्लेखोर बिबट्या आणि सहा तासांचा थरार


हल्लेखोर बिबट्या आणि सहा तासांचा थरार
SHARES

मुंबईत असलेल्या वनपरिसरातून जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये येण्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहे. अशीच एक घटना शनिवारी सकाळी मुलुंडच्या नानेपाड्यात घडली. भल्या सकाळीच हा बिबट्या नानेपाड्यात दाखल झाला आणि परिसरात एकच खळबळ माजली.


कसा शिरला बिबट्या?

सकाळच्या थंडीत ६ वाजता मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या नानेपाड्यातल्या रहिवाशांना बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे गोंधळ न उडता तरच नवल. तसा तो उडालाही. हा बिबट्या नानेपाड्यात आल्या आल्या एका इमारतीमध्ये शिरला. आत जाताच त्याने इमारतीच्या बेसमेंटमध्ये आसरा घेतला.


६ जणांवर केला हल्ला

एव्हाना इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. जो तो बिबट्या कुठे आहे? कसा आला? कुठे गेला? यावर चर्चा करत होता. यादरम्यान बिबट्याने ६ जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. या जखमींना वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं.


६ तासांचा थरार आणि बिबट्या जेरबंद

हा थरार सुरु असताना दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी, संजय गांधी उद्यानाचे अधिकारी, पोलिस यांचे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. तब्बल सहा तासांच्या थरारानंतर या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करून पकडण्यात यश आलं.

भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी बिबट्याला पकडण्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
हेही वाचा

१२ तासांनंतर शेर-ए-पंजाबमध्ये घुसलेला बिबट्या जेरबंद!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा