Advertisement

गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात बिबट्याचा वावर, सीसीटीव्हीत...

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात बिबट्याचा वावर, सीसीटीव्हीत...
(Representational Image)
SHARES

शहरातील उच्चभ्रू परिसरात एक बिबट्या (Leopard in Mumbai video) फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बिबट्याच्या मानेवर रेडिओ कॉलर लावलेली व्हिडिओत दिसत आहे.   

हा व्हिडीओ मुंबईच्या गोरेगाव परिसरातील असल्याचं सांगितलं जातं आहे (leopard in Goregaon gokuldham society) . विराट सिंह नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या मुंबईतील गोरेगाव पूर्वतील गोकुलधाम परिसरात दिसला आहे. वनविभागानं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्कचे चीफ कन्झर्व्हेटर जी. मल्लिकार्जुन यांनी परिसरातील लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. या परिसरात वनविभागाचे कर्मचारी तैनात केले जातील, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील कॉलनीबाहेर बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. कॉलनी, बिल्डिंगच्या गेटसमोर तसंच अगदी पार्किंगमध्येही हा बिबट्या दिसून आला आहे. बिबट्याचे तब्बल ३ व्हिडीओ समोर आले आहेत.

एका व्हिडीओत बिबट्या कॉलनीच्या गेटबाहेर फेऱ्या मारताना दिसतो. त्यानंतर तो थोडावेळ गेटबाहेर बसतो. एका व्हिडीओत तो चक्क एका बिल्डिंगच्याच गेटबाहेर उभा असल्याचं दिसतो आहे. सुदैवानं बिल्डिंगचा गेट बंद होता त्यामुळे बिबट्या बिल्डिंगमध्ये घुसला नाही. एका व्हिडीओ तो पार्क गेलेल्या गाड्यांजवळ उभा आहे.

अहवालानुसार, सप्टेंबर २०२१ मध्ये जेव्हा बिबट्याचे हल्ले वाढले होते तेव्हा C-33 डेल्टा आरे मिल्क कॉलनीतून पकडण्यात आला होता. मग त्याला रेडिओ-कॉलर लावून सोडले. कारण तो मानवावरील हल्ल्यांसाठी जबाबदार नव्हते.

गोकुळधाममध्ये बिबट्या दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. असं मानलं जातं की, रस्त्यावरील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी वन्य प्राणी निवासी भागात येत आहेत. 



हेही वाचा

राणीच्या बागेत प्राण्याचं बारसं; एकाच 'ऑस्कर' नाव तर दुसऱ्याच 'वीरा'

शुक्रवार- शनिवारी 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा