Advertisement

मुंबई सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग


मुंबई सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग
SHARES

मुंबई सत्र न्यायालयाच्या इमारतीला सकाळी ७ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत आगीवर ताबा मिळवत ही आग विझवली. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कमला मिल आगीनंतर मुंबईत सुरु झालेली आगीची मालिका काही थांबताना दिसत नाही. दररोज मुंबईत आगीच्या घटना घडत असून कर्मवीर भाऊराव मार्गावरील सत्र न्यायालयाला सकाळी ७ वाजेच्या दरम्यान आग लागली. तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. ७ वाजून १४ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. ही आग ताबडतोब विझवण्यात आली.  

सकाळच्या वेळेत सत्र न्यायालयाची इमारत बंद असल्याने सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा