ब्रिटीशकालीन आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर वीज कोसळली

Kala Ghoda
ब्रिटीशकालीन आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर वीज कोसळली
ब्रिटीशकालीन आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर वीज कोसळली
See all
मुंबई  -  

दक्षिण मुंबईतील काळाघोडासमोरील आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पावसादरम्यान वीज कोसळली. विजेमुळे या ब्रिटीशकालीन इमारतीचे काही दगडी भाग तुटून तो रस्त्यांवरुन जात असलेल्या बेस्ट बस आणि टॅक्सीवर कोसळला. सुर्दैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर ही इमारत त्वरीत खाली करून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. तोपर्यंत इमारतीचा वापर न करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहे.


सायंकाळच्या पावसातील घटना

शुक्रवारी संध्याकाळी नरिमन पॉईंट परिसरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी काळाघोडा चौकातील १०० वर्षांहून जुनी आणि पुरातन वास्तू असलेल्या आर्मी अॅण्ड नेव्ही इमारतीवर अचानक वीज कोसळली. जोरदार आवाज होऊन इमारतीचे दगड खाली कोसळून बेस्ट बस आणि टॅक्सीवर पडले. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ झाला, सर्वजण सैरावैरा पळू लागले.इमारत खाली

या घटनेनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी त्वरीत बंद करण्यात आला. शिवाय या इमारतीतील सर्व कार्यालये तसेच दुकाने बंद करण्याच्या सूचना करत सर्वांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीचे निखळलेले दगड काढण्यात आले असून यानंतर धोकादायक इमारत म्हणून त्वरीत महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती ‘ए’ विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

या नोटीसमध्ये इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये ही इमारत धोकादायक नसल्याचे आढळून आल्यास त्या ठिकाणी लोकांना प्रवेश दिला जाईल. मात्र, तोपर्यंत दुकाने व कार्यालये यांचा वापर न करण्याच्या सूचना केल्याचे दिघावकर यांनी सांगितले.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.