Advertisement

यापुढे बार, दारूच्या दुकानांवर देवी-देवतांची नावे दिसणार नाहीत


यापुढे बार, दारूच्या दुकानांवर देवी-देवतांची नावे दिसणार नाहीत
SHARES

‘दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव द्या, मग कसा खप वाढतो ते बघा', असा अजब सल्ला काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद उफाळून आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील देशी दारूची दुकाने आणि बीअर बारला महापुरुष, देवी-देवता तसेच गडकिल्ल्यांची नावं देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.


हा महापुरुषांचा अवमान

मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारू, बीअर बारला महापुरुषांची नावे न देण्याची मागणी केली होती. सद्यस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी बीअर बार, दारूची दुकाने आणि परमिट रूमला महापुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावं देण्यात आलेली आहेत. हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारं हे चित्र नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.


कायद्यात सुधारणा करणार

आ. पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. बैठकीत देशी दारूची दुकाने, बीअर बार आणि परमिट रूमला महापुरुषांची तसेच देवी-देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत कामगार विभाग कायद्यात सुधारणा करणार असल्याचं सांगाण्यात येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा