Advertisement

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते.

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर
SHARES

पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने जाहीर केली आहे. मुंबईत एकूण 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत. या  इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 10 इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. 

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणात 21 इमारती अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आहे. 

या अतिधोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे एकूण 717 रहिवासी / भाडेकरू आहेत. यापैकी 193 निवासी भाडेकरू / रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 20 निवासी भाडेकरू /रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित 247 निवासी भाडेकरू / रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी/ भाडेकरू यांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या सूचना देण्याची व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अतिधोकादायक इमारतींची यादी 

-इमारत क्रमांक 144, एमजीरोड,अ- 1163 (मागील वर्षीच्या यादीतील)     

इमारत क्रमांक 133 बी बाबुलाल टॅंक रोड, बेगमोहम्मद चाल  

इमारत क्रमांक 54 उमरखाडी, 1ली गल्ली छत्री हाऊस 

इमारत क्रमांक 101-111, बारा इमारत रोड, (मागील वर्षीच्या यादीतील)  

इमारत क्रमांक 74 निजाम स्ट्रीट,  (मागीलvवर्षीच्या यादीतील)  

इमारत क्रमांक 123, किका स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)  

इमारत क्रमांक 166 डी मुंबादेवी रोड (मागील वर्षीच्या यादीतील)   

इमारत क्रमांक 2-4 ए, 2री भोईवाडा लेन ,  

इमारत क्रमांक 42 मस्जिद स्ट्रीट   

इमारत क्रमांक 14 भंडारी स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)   

इमारत क्रमांक 64-64 ए भंडारीस्ट्रीट, मुंबई   

इमारत क्रमांक 1-3-5 संत सेना महाराज मार्ग   

इमारत क्रमांक 3 सोनापूर 2 री क्रॉस लेन   

इमारत क्रमांक 2-4 सोराबजी संतुक लेन  ,    

इमारत क्रमांक 387-391,बदाम वाडी व्ही पी रोड  (मागीलवर्षीच्या यादीतील)  

इमारत क्रमांक 391 डी बदाम वाडी,व्ही पी रोड  (मागीलवर्षीच्या यादीतील)   

इमारत क्रमांक 273-281 फॉकलँड रोड , डी, 2299- 2301 (मागील वर्षीच्या यादीतील)   

इमारत क्रमांक 1, खेतवाडी 12 वी गल्ली (डी) 2049 (मागील वर्षीच्या यादीतील)  

इमारत क्रमांक 31 सी व 33 ए रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी  

इमारत क्रमांक 104-106 मेघजी बिल्डिंग अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग  

इमारत क्रमांक 15-19 के. के. मार्ग व 1-3 पायस स्ट्रीट



हेही वाचा - 

मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा