Advertisement

'ह्या' राज्यांमध्ये जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य, अन्यथा मिळणार नाही प्रवेश

प्रवाशांना कोणत्या राज्यांनी निगेटिव्ह आरटी-पीसीआर अनिवार्य केली आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. चाचणी अहवाल नसेल तर प्रवाशांना त्या राज्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही.

'ह्या' राज्यांमध्ये जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य, अन्यथा मिळणार नाही प्रवेश
SHARES

देशात कोरोनाचा कहर झाला आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच राज्य सरकारांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी विमान आणि रेल्वे या दोन्ही मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी निगेटिव्ह आरटी-पीसीआर (RT-PCR) अनिवार्य केली आहे.

प्रवाशांना कोणत्या राज्यांनी  निगेटिव्ह आरटी-पीसीआर अनिवार्य केली आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. चाचणी अहवाल नसेल तर प्रवाशांना त्या राज्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

ही आहेत राज्ये

महाराष्ट्र

केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, गुजरात आणि उत्तराखंड येथील रेल्वे प्रवाशांना आता महाराष्ट्रात येण्यासाठी प्रवास सुरू झाल्याच्या ७२ तासांच्या आत आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असेल तरच या प्रवाशांना राज्यात येता येणार आहे. 

राजस्थान

राजस्थानमध्येही जाण्यासाठी प्रवाशांकडे 72 तासांच्या आत केलेल्य़ा आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. 

उत्तराखंड

उत्तराखंड सरकारने महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमधून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य केला आहे.

गुजरात

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधून येणाऱ्या प्रवाशांकडं आरटी-पीसीआर नकारात्मक चाचणी अहवाल ७२ तासांच्या आतील असावा. 

हिमाचल प्रदेश

पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून हिमाचल प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल दाखवणं आवश्यक आहे.

काश्मीर

श्रीनगरचे उपायुक्त मोहम्मद ऐजाज असद यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांना कुलगाम जिल्ह्यात कोरोनाची चाचणी करून घ्यावी लागेल.

मध्य प्रदेश

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधून मध्ये प्रदेशात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांच्या आता केलेला आरटी-पीसीआर नकारात्मक चाचणी अहवाल बंधनकारक आहे.

पश्चिम बंगाल

आपण दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून पश्चिम बंगालमध्ये येत असाल कोरोना निगेटिव्ह अहवाल असं आवश्यक आहे. 

आसाम

आसाम सरकारने राज्यात येणाऱ्या सर्व हवाई प्रवाशांना रॅपिड अँटिजेन चाचणी बंधनकारक केली आहे. ही चाचणी विनाशुल्क असेल. जर प्रवाशांची चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्यांना घरात विलगीकरणात किंवा  खासगी रुग्णालयात किंवा सरकारी आरोग्य संस्थेत दाखल व्हावं लागेल. एखाद्या हवाई प्रवाशाचा निगेटिव्ह अहवाल आल्यास  त्याला विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. 

दिल्ली

महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांकडं  ७२ तासांच्या आतील नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आवश्यक असेल. जर प्रवाशांकडे चाचणी अहवाल नसेल तर त्याला १४ दिवस क्वारंटाईन केलं जाईल. 

अंदमान - निकोबार 

विमानतळावर येणार्‍या सर्व प्रवाशांकडं आरटी-पीसीआर नकारात्मक चाचणी अहवाल ४८ तासांच्या आतील असावा. कोरोनाचा चाचणी न केलेल्या प्रवाशांना त्याच विमानाने पुन्हा पाठवलं जाणार आहे. 

छत्तीसगड

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केंद्रशासित प्रदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांची  रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि इतर प्रवेशाच्या ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. 



हेही वाचा -

लाॅकडाऊनमध्ये खासगी कार्यालये बंद, 'ही' कार्यालयं असतील सुरू

लॉकडाउनमध्ये नोकरी नाही? घरी बसून 'हे' काम करा, चांगली कमाई होईल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा