Advertisement

'ती' ३२ मजली इमारत राहण्यास योग्य?

लाॅयड्स इस्टेट या ३२ मजली इमारतीला कोणत्याही प्रकारचा धोका नसून इमारत राहण्यास योग्य असल्याचा अभिप्राय कोर्ट कमिशनर शांतीलाल जैन यांनी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभागाला दिल्याची महिती मिळत आहे. त्यामुळे खचलेला भाग रबरसह मातीने त्वरीत बुजवण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.

'ती' ३२ मजली इमारत राहण्यास योग्य?
SHARES

अॅन्टॉप हिल-वडाळ्याच्या लॉयड्स इस्टेट या ३२ मजली इमारतीशेजारी जमीन खचल्यामुळे या इमारतीला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी या रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचनाही महापालिकेकडून देण्यात आली. प्रत्यक्षात या ३२ मजली इमारतीला कोणत्याही प्रकारचा धोका नसून इमारत राहण्यास योग्य असल्याचा अभिप्राय कोर्ट कमिशनर शांतीलाल जैन यांनी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभागाला दिल्याची महिती मिळत आहे. त्यामुळे खचलेला भाग रबरसह मातीने त्वरीत बुजवण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.


अभिप्रायात नमूद

अॅन्टॉप हिल मधील दोस्ती एकर्स परिसरातील ३२ मजली लॉयड्स इस्टेट इमारतीशेजारीच दोस्ती रिएल्टर्स या विकासकाचं काम सुरु होतं. त्यामुळे या दोन्ही जागांबाबत वाद सुरु असल्याने न्यायालयाने कोर्ट कमिशनर म्हणून शांतीलाल जैन यांची नेमणूक केली होती. त्यामुळे सकाळी दुघर्टना घडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत शांतीलाल जैन यांच्याकडून अभिप्राय घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी ही इमारत धोकादायक नसल्याचं मत नोंदवलं असल्याची माहिती इमारत प्रस्ताव विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजतं.



काम थांबवण्याचे आदेश

दरम्यान दोस्ती रिएटर्स या विकासकाला पावसाळा संपेपर्यंत बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या विकासकाने १५ ते १८ मीटर खोलपर्यंत खोदकाम केलं होते. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे माती निखळून जमीन ढासळण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याबाबत जे सुरक्षिततेचे उपाय आहेत, ते घेतलं जात असल्याचं अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केलं. तसंच जो भाग खचला आहे तो त्वरीत रबरसह मातीने भरण्याचे निर्देश दिले असल्याचं समजत आहे.

दरम्यान, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लॉयड्स इस्टेट इमारतीच्या दुघर्टनेप्रकरणी संबंधित बिल्डरवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याच्या शेजारच्या टॉवरला धोका निर्माण झाल्यामुळे थर्ड पार्टी स्टॅबिलिटी ऑडिट करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.



हेही वाचा-

मुंबईत पाणी तुंबलं, महापौरांनी नाही पाहिलं

गोल मस्जिदजवळ रस्ता खचला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा