Advertisement

गोल मस्जिदजवळ रस्ता खचला


गोल मस्जिदजवळ रस्ता खचला
SHARES

मेट्रो सिनेमा परिसरातील गोल मस्जिदजवळील रस्त्याखालून जाणारी जलवाहिनी सोमवारी संध्याकाळी फुटल्याने येथील रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. मात्र, हे गळती दुरुस्तीचं काम वेळेत पूर्ण न झाल्यास चर्चगेट परिसरातील नागरिकांना सकाळी पाण्याचा पुरवठा होणार नाही. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल परिसरात येत असल्यामुळे गोल मस्जिदचा मार्ग बंद राहिल्यास या भागात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


जलवाहिनी फुटून खड्डा 

काळबादेवी परिसरातील मेट्रो सिनेमाजवळील आनंदीलाल पोद्दार रोडवर असलेल्या गोल मस्जिदजवळ सोमवारी पावणे पाचच्या सुमारास रस्ता खचला. या रस्त्याखालून जात असलेली  ४५० मि.मी व्यासाची जलवाहिनी फुटून ५ फूट बाय ५ फूट आकाराचा खड्डा खडला. त्यामुळे जलविभागाच्या माध्यमातून ही गळती शोधून ती दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही दुरुस्ती तातडीनं करण्यात येणार असल्याचं ‘ए’विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केलं. मात्र,  दुरुस्तीच्या कामाला वेळ लागल्यास चर्चगेट परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, असे दिघावकर यांनी सांगितलं.


पंतप्रधान मंगळवारी मुंबईत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबईच्या भेटीवर आहेत. योगायोगाने ते बॉम्बे हॉस्पिटल परिसरात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी गोल मस्जिदचा मार्ग सोयीचा असल्यामुळे या मरिन लाईन्सपासून सर्वच प्रवाशी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्ती व रस्त्यांचे काम करण्यासाठी हे काम बंद ठेवावं लागल्यास मंगळवारी या परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याचीही भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीनं युध्दपातळीवर हे काम सुरु आहे.



हेही वाचा-

बीएससी-आयटीचा निकाल जाहीर

तुंबईवरून उद्धव यांची नरमाई


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा