Advertisement

तुंबईवरून उद्धव यांची नरमाई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, ते म्हणाले ''मुंबईत विविध प्राधिकरणांची कामे सुरु आहेत. त्यामुळे मी आता आता कोणावरही आरोप करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. मुंबईकरांना त्रास होत असताना आपण आपण आरोप करणं बरं नाही, असं सांगत त्यांनी मेट्रोच्या कामावर टीका करणं टाळलं.''

तुंबईवरून उद्धव यांची नरमाई
SHARES

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे यंदा पाणी तुंबण्याची शक्यता असून पावसात पाणी तुंबल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जातो. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पाणी तुंबण्यामागे विविध प्राधिकरणांची सुरू असलेली कामे आहेत, असं सांगत भाजपावर आरोप करणं टाळलं. काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतल्यानंतर भाजपाशी पॅचअप झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे.


महापौरांची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमात मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबेल, असं सांगून यापूर्वी मेट्रोच्या कामांवर खापर फोडलं होतं. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मेट्रो रेल्वेच्या कामांबाबत आरोप करत पावसात पाणी तुंबल्यास त्याला सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.


काय म्हणाले उद्धव?

सोमवारी मुंबईतील शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडून अनेक भाग जलमय झाले. याबाबत महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षात पाहणीसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, ते म्हणाले ''मुंबईत विविध प्राधिकरणांची कामे सुरु आहेत. त्यामुळे मी आता आता कोणावरही आरोप करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. मुंबईकरांना त्रास होत असताना आपण आपण आरोप करणं बरं नाही, असं सांगत त्यांनी मेट्रोच्या कामावर टीका करणं टाळलं.''

यावेळी त्यांनी महापालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं, चेरापुंजीपेक्ष जास्त पाऊस पडूनही गेल्या वर्षीप्रमाणं पाणी तुंबून राहिलेलं नाही. याची कल्पना मुंबईकरांना आहे. मुंबईत मोठ्याप्रमाणात पाणी तुंबलं किंवा साचलं असं कुठेही दिसून आलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.


महापालिकेतूनच लक्ष ठेवलं

भाजपाचे आशिष शेलार यांनी महापौरांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेवर टीका केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्निक महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाला भेट दिली. मात्र, उद्धव ठाकरे महापालिकेत येणार असल्याची कल्पना त्यांनी फक्त महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिली. परंतु महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना कुणालाही याची कल्पना देण्यात आली नव्हती.

उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेतील आगमनाची कल्पना कुणालाच नसल्यामुळे कुठल्याही लवाजाम्याशिवाय आपत्कालिन नियंत्रण कक्षात जावून मुंबईतील विविध घटनांची माहिती त्यांनी आयुक्तांकडून घेतली. त्यामुळे शेलार यांच्या टिकेला उद्धव ठाकरे यांनी या नियंत्रण कक्षाची पाहणी करून पळून नाही तर महापालिकेतून लक्ष ठेवून दाखवलं, अशी प्रतिक्रिया अप्रत्यक्ष व्यक्त केली.



हेही वाचा-

अॅन्टाॅप हिलमधील लॉयड्स इस्टेट इमारतीला तडे, दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा