Advertisement

महाराष्ट्रात लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपासून १ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे शासनाचे आदेश गुरूवारी जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर
SHARES

कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपासून १ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे शासनाचे आदेश गुरूवारी जारी करण्यात आले आहेत. लाॅकडाऊनला मुदतवाढ देतानाच निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १ मे पर्यंत असलेल्या या निर्बंधांना १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी संपत असल्याने बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊनवर चर्चा करण्यात आली. 

कडक निर्बंधामुळे राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली असली तरी अजूनही काही जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. हा निर्णय मुख्यमंत्रीच जाहीर करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली होती. त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा- मुंबईत 'म्युकरमायकोसिस'चे १११ रुग्ण आढळले

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्याबाहेरुन महाराष्ट्रात (maharashtra) येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीआसीरआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही चाचणी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ४८ तास आधी केलेली असावी तसंच ती निगेटिव्ह असावी असं आदेशात नमूद आहे. 
  • देशातील अन्य कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.
  • दरम्यान माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये चालक आणि क्लिनर या दोघांव्यतीरिक्त अन्य कुणालाही मुभा नसेल. त्यांनाही ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल देणं बंधनकारक आहे.
  • विमानतळ, मालवाहतूक, औषधांचा पुरवठा आणि कोविड व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्यात सूट.
  • स्थानिक बाजारपेठा तसंच एपीएमसीवर लक्ष ठेवून कोरोनाच्या नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पालिकांची असेल. नियमांचं पालन होत नसल्यास स्थानिक प्रशासन तिथं निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.
  • दूधसंकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावरील निर्बंध या काळात शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे दूध विकण्यावर अत्यावश्यक सेवेत असल्याने दिलेल्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत घरपोच सेवा सुरू राहील.
  • एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले आहेत. निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी, असं सागंण्यात आलं आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा