Advertisement

४ महिन्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद

IIT दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधात अधिक परिणामकारक असं औषध शोधून काढलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

४ महिन्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून समाधानकारक बातमी आली आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तर मृत्यूदरातही घट झाली आहे. राज्यात सोमवारी (२८ सप्टेंबर) १९ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर दिवसभरात १८० जणांचा मृत्यू झाला. गेल्या ४ महिन्यातली ही सर्वात कमी मृत्यू संख्या आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७७.७१ एवढी झाली आहे.

हेही वाचाः- २ टक्के लोकं कळत-नकळतपणे मुंबईकरांना मारत आहेत- महापौर

दिवसभरात ११ हजार ९०० नवे रुग्ण आढळून आलेत. सध्या राज्यात २ लाख ६५ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाव्हायरसवर प्रभावी असं औषध नाही. मात्र कोरोनामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांनुसार सध्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या ज्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत, त्या औषधांपेक्षाही प्रभावी असं औषध भारतीय शास्त्रज्ञांना सापडलं आहे. IIT दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधात अधिक परिणामकारक असं औषध शोधून काढलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  

हेही वाचाः- गुड न्यूज! रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मात्र सध्या मुंबईसह राज्यात प्लाझ्मा थेअरिपीचा वापर करून नागरिकांना बरे करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा