जोगेश्वरीमध्ये सिलेंडरचा स्फोट, १३ जण गंभीर जखमी

मुंबईतील जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला असून या घटनेमध्ये १३ जण भाजल्याची माहिती समोर येत आहे.

SHARE

मुंबईतील जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला असून या घटनेमध्ये १३ जण भाजल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांना ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, ५ जणांची प्रकृती गंभीर असून ५ जणांना प्राथमीक उपचार करून डिचार्झ देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.


जखमींची नावं

निरू मलिक (२०), गुडिया गुप्ता (३५), अंश गुप्ता (), दीपक राय (४७), तौफिक शेख (२०), राहुल सिंग (२३), शकंतुला कागल (४६), शहनाज शेख (३०), मल्लिका शेख (१२), उशा उमरे (३०), आलिम शेख (), प्रियांका नलावडे (२६), अनुष्का सिंग (१८) अशी या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.


आगीवर नियंत्रण

जोगेश्वरी पश्चिम येथील हनुमान चाळ येथे सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाले. त्यावेळी अग्नीशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामुळं १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.हेही वाचा -

यंदाचा विश्वचषक आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक - विराट कोहली

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, रेल्वे वाहतूक उशीरानंसंबंधित विषय
ताज्या बातम्या