Advertisement

यंदाचा विश्वचषक आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक - विराट कोहली

हा विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. विराट कोहलीचा हा तिसरा विश्वचषक आहे. मात्र, कर्णधार म्हणून तो प्रथमच विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे हा विश्वचषक आव्हानात्मक असेल, असं विराट म्हणाला.

यंदाचा विश्वचषक आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक - विराट कोहली
SHARES

यंदाचा वर्ल्डकप सर्वात आव्हानात्मक असून कमकुवत वाटणारा संघही दिग्गज संघाला हरवू शकतो, त्यामुळे  कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही, असं मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलं. विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. भारतीय संघ मंगळवारी रात्री इंग्लंडला रवाना होणार आहे. 


सैनिकांसाठी जिंकू

हा विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. विराट कोहलीचा हा तिसरा विश्वचषक आहे. मात्र, कर्णधार म्हणून तो प्रथमच विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे हा विश्वचषक आव्हानात्मक असेल, असं विराट म्हणाला.  या विश्वचषकात मोठ्या धावसंख्या होण्याचा अंदाजही त्याने व्यक्त केला. विराट म्हणाला की, आमचे गोलंदाज फिट आहेत ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. ५० षटकं पूर्ण क्षमतेने टाकण्यासाठी ते सज्ज आहेत. इंग्लंडमधील खेळपट्ट्या, हवामान याचा विचार न करता कोणत्याही दबावाशिवाय वर्ल्डकपच्या मैदानात उतरायला हवं असं माझं मत आहे. 


संघ अत्यंत संतुलित 

सध्याच्या भारतीय संघ अत्यंत संतुलित असल्याचं यावेळी रवी शास्त्री म्हणाले. आपण जीव ओतून खेळलो तर विश्वचषक आपलाच आहे, असा विश्वास व्यक्त करून संघात धोनीची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. धोनीने बराच काळ संघाची धुरा वाहिलेली आहे. त्या अनुभवाचा निश्चितच फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले. 


५ जूनला सामना

३० मेपासून विश्वचषकाची सुरुवात होत आहे. ५ जूनला भारताचा दक्षिण आफ्रिकेसोबत या विश्वचषकातला पहिला सामना होईल. पण त्यापूर्वी २५ मे रोजी न्यूझीलंड आणि २८ मे रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे. या सामन्यातूनच उभय संघांना खेळपट्टीचा अंदाज घेता येईल.हेही वाचा  -

क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल, मिळणार ४० लाख डाॅलरचं बक्षीस
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा