Advertisement

धारावीतील सिलिंडर स्फोटात १७ जखमी


धारावीतील सिलिंडर स्फोटात १७ जखमी
SHARES

मुंबईतील धारावी येथील शाहूनगर परिसरात सिलिंडरचा स्फोट झाला. रविवारी दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला. या दुर्घटनेत १७ नागरिक जखमी झाले असून जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये ३ बालकांचाही समावेश आहे. वायुगळती होणारा सिलिंडर पहिल्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्यानंतर त्याचा स्फोट झाल्याचे समजतं.


धारावीतील शाहूनगर-कमलानगर इथं दुपारी ही दुर्घटना घडली. २ मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घराच्या बाहेर ठेवलेल्या सिलिंडरमधून वायुगळती सुरू झाली. त्यानंतर तो खाली फेकण्यात आल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा स्फोट झाला.   


अग्निशमन दलाने १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. सितारादेवी जयस्वाल (४० वर्षे), शौकत अली (५८), सोनू जयस्वाल (८ ), अंजू गौतम (२८), प्रेम जयस्वाल (३२) हे स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. सिलिंडर खाली फेकून देणाऱ्या मेहराज याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा