Advertisement

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात

नवीन आर्थिक वर्षापासून नवे दर लागू होणार.

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात
प्रतिकात्मक फोटो
SHARES

देशात लोकसभा निवडणुका होणार असून त्यामुळे सरकारने एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात केली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दरम्यान, गॅसच्या दरात कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवे दर आजपासून (1 एप्रिल) लागू झाले आहेत.

दिल्ली ते कोलकाता एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती

1 एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपयांवर आली आहे. 32 रुपयांच्या कपातीनंतर कोलकातामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1879 रुपये होईल.

मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये, चेन्नईमध्ये 30.50 रुपयांच्या कपातीसह 1930 रुपयांना मिळणार आहे.

तुमच्या शहरातील 19 किलो LPG गॅसची नवीन किंमत जाणून घ्या

दिल्ली- 1764.50

कोलकाता - 1879.00

मुंबई - 1717.50

चेन्नई - 1930.00

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 1 एप्रिलपासून लागू झाल्या आहेत. यापूर्वी 1 मार्च रोजी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1795 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपये होती.

महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी

यापूर्वी केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त गृहिणींना दिलासा दिला होता. त्यावेळी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती. सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.हेही वाचा

वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल 18% ने वाढवला

सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम तिसऱ्यांदा पुढं ढकललं!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा