Advertisement

मुंबईत गॅस सिंलेंडरच्या किंमतीत 'इतकी' वाढ

विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

मुंबईत गॅस सिंलेंडरच्या किंमतीत 'इतकी' वाढ
SHARES

गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचं जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.


मुंबईत किंमती किती वाढल्या?

मुंबईत गॅस किमती या १४५ रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना ८२९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता १४४.५० रुपयांनी वाढून ८५८.५० रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये १४९ रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये १४७ रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या ८८१ रुपये झाल्या आहेत.

राज्य१२ फेब्रुवारी २०२०१ जानेवारी २०२०
मुंबई८९६७४७
दिल्ली८५८७१४
चेन्नई८२९.५०६८४.५०
कोलकाता८८१७३४


सरकार १२ सिलिंडरवर अनुदान देते

सध्या सरकार एका घरात प्रत्येक घरासाठी १४.२ किलोचे १२ सिलिंडर्स अनुदान देते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला बाजारभावानं खरेदी करावी लागेल. सरकार दरवर्षी १२ सिलिंडरवर अनुदान देत असेल तरी याची किंमत देखील महिन्यात बदलत असते. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटक अनुदानाची रक्कम निश्चित करतात.

295 रुपयांनी वाढ

ऑगस्टमध्ये एलपीजी सिलिंडर सुमारे ६२ रुपयांनी स्वस्त झाला. यानंतर दरमहा किंमत वाढत गेली. ऑगस्टपासून घरगुती गॅस सुमारे २९५ रुपयांनी महागला आहे. ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडर्सची किंमत दिल्लीत ५७४.५० रुपये, कोलकातामध्ये ६०१ रुपये, मुंबईत ५४६.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ५९०.५० रुपये होती. त्याचबरोबर आता त्यांचे दर ८५८ रुपये, ८९६ रुपये, ८२९.५० रुपये आणि ८८१ रुपये झाले आहेत.

व्यावसायिक सिलिंडरची किंमत?

१ फेब्रुवारी २०२० रोजी सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाआधी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत २३२ रुपयांनी वाढ झाली होती. १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. १ फेब्रुवारीपासून या सिलिंडरची किंमत दिल्लीत १ हजार ४६६ रुपये, कोलकातामध्ये १ हजार ५४० रुपये, मुंबईत १ हजार ४१६ रुपये आणि चेन्नईमध्ये १ हजार ५८९.५० रुपये केली आहे. तर जानेवारीत १९ किलो सिलिंडरची किंमत मुंबईत १ हजार १९० रुपये, दिल्लीत १ हजार २४१ रुपये, कोलकातामध्ये १ हजार ३०८.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १ हजार ३६३ रुपये होती.



हेही वाचा

मेट्रोकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ही' अनोखी सुविधा

'या' धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा