Advertisement

मढ ते वर्सोवा प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत, जाणून घ्या कसा

गुरूवारी झालेल्या MCZMA च्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे.

मढ ते वर्सोवा प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत, जाणून घ्या कसा
SHARES

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCMZA) ने गुरुवारी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) ला पश्चिम उपनगरातील मढ बेट ते वर्सोवा जोडणाऱ्या वर्सोवा खाडीवर केबल-स्टेसाठी मंजुरी दिली आहे. 

प्रकल्प पूर्ण झाल्यावर, मढ ते वर्सोवा प्रवासाचा सध्याचा वेळ 1.5 तासांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होईल. या पुलामुळे 22 किलोमीटरचे अंतर अवघ्या 1.5 किलोमीटरमध्ये कापता येणार आहे. सध्या दोन ठिकाणांमधली एकमेव जोडणी ही लोक आणि दुचाकी वाहनांच्या फेऱ्यांद्वारे आहे. 

मुंबईचा विकास आणि तेथील नागरिकांच्या सोयीशी निगडित असा हा प्रकल्प असून, त्याचा लाभ लाखो नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. हा प्रकल्प उत्तर-पश्चिम उपनगरातील प्रस्तावित वाहन पुलांच्या मालिकेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश अंधेरी, मढ, बोरिवली आणि गोराई भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणे आहे.

स्थानिक लोकांच्या तसेच जवळच्या मच्छिमार समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा एक उपयुक्त दुवा असेल. प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे CO2 उत्सर्जन सुमारे 93% कमी होईल त्यामुळे दीर्घकालीन पर्यावरणीय चिंतांसाठी ते फायदेशीर आहे.

दरम्यान याव्यतिरिक्त मार्वे-मनोरी यांना जोडणारा पूल, ओशिवरा नदीवर आणि मालाड खाडी जोडणारा पूल, आहे. मढ खाडी वर धारिवली पूलावरील पूल देखील वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

सध्या वर्सोवा-मढ दरम्यान फेरी द्वारा प्रवास केला जात आहे. या फेरी प्रवासामध्ये नागरिक आणि दुचाकींदेखील वाहतूक होते. गुरूवारी झालेल्या MCZMA च्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा