महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पहिल्यांदाच पहिल्यांदाच राज्याचा हा ९४.१ टक्के एवढा उच्चांकी झाला आहे. कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने हा दरही वाढला आहे. दिवसभरात राज्यात ४ हजार ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही १७ लाख ६९ हजार ८९७ एवढी झाली आहे. राज्यात ४ हजार ३०४ नवे रुग्ण आढळले. तर ९५ जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा २.५८ एवढा झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही १८ लाख ८० हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या ६१ हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
स्वदेशी कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीबाबत मोठी माहिती समोर येते आहे. या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. आता या लशीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा परिणाम समोर आला आहे. लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्या आहेत.