Advertisement

राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे 'या' दिवसापासून भक्तांसाठी खुली

राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळं खुली करण्याची तारीख अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे 'या' दिवसापासून भक्तांसाठी खुली
SHARES

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील प्रार्थना स्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केलं आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावं लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालंच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागानं एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.



हेही वाचा

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार, 'ही' आहे नियमावली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा