Advertisement

महाराष्ट्रात १५ एप्रिलपर्यंत निर्बंध, ‘अशी’ आहे नाईट कर्फ्यूची वेळ...

जमावबंदी आदेश १५ एप्रिलपर्यंत अंमलात असेल. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना १ हजार रुपये दंड भरावा लागेल.

महाराष्ट्रात १५ एप्रिलपर्यंत निर्बंध, ‘अशी’ आहे नाईट कर्फ्यूची वेळ...
SHARES

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आणि वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिल्या आहेत. निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे.

त्यानुसार राज्यात १५ एप्रिलपर्यंत अगोदर लागू केलेले सर्व निर्बंध पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणं, सोशल डिस्टन्स ठेवणं, आदी सर्व आदेश पाळावे लागतील. कार्यालयात यापूर्वी लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेन्मेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील.

जमावबंदी आदेशानुसार महाराष्ट्रात (maharashtra) २७ मार्च २०२१ पासून ५ पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी आदेश लागू असेल. हा आदेश १५ एप्रिलपर्यंत अंमलात असेल. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना १ हजार रुपये दंड भरावा लागेल.

हेही वाचा- सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू

सार्वजनिक ठिकाणांनाही वेळ मर्यादा

इतर निर्बंधांमध्ये सार्वजनिक उद्याने व सागरी किनारे रात्री ८ पासून सकाळी ७ पर्यंत बंद असतील. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना १५ एप्रिलपर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल ५० लोक तर अंतिम संस्कारासाठी २० लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी १५ एप्रिलपर्यंत लागू असेल.

कार्यालयांत ५० टक्केच उपस्थिती

सर्व खाजगी कार्यालय आरोग्याशी संबंधित, कोरोनाबाबतच्या सर्व (coronavirus) नियमांचं पालन करून ५० टक्के उपस्थितीतीसह काम करतील. अशा ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. तर शरीराचं तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि सार्वजनिक वापरासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल.

माॅल्स, उपहारगृहेही बंद

सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील. याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड -१९ ची साथ असेपर्यंत बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा