Advertisement

“होळी, रंगपंचमीला गर्दी नको, नियमांचं पालन करा”

यावर्षी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन राज्य शासनाने केलं आहे.

“होळी, रंगपंचमीला गर्दी नको, नियमांचं पालन करा”
SHARES

सध्या राज्यात मोठ्या शहरांपासून लहान खेडेगावापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे एकत्रित येऊन उत्सव साजरा करणं योग्य होणार नाही. म्हणूनच यावर्षी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन राज्य शासनाने केलं आहे.

या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी २८ मार्च २०२१ रोजी होळीचा सण आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा.

हेही वाचा- लोकलची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के उपस्थितीचा बीएमसीचा आदेश 

रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-१९ चा (coronavirus) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

होळी/शिमगा सणाच्या निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदीरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसंच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसंच होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.

कोविड-१९ च्या विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावं, असंही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

(maharashtra government requests to avoid rush in holi due to covid 19)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा