Advertisement

राणीच्या बागेचा लवकरच विस्तार


राणीच्या बागेचा लवकरच विस्तार
SHARES

भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान (राणीची बाग) आणि प्राणीसंग्रहालयासाठी आरक्षित असलेली ५० टक्के जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे राणीच्या बागेचं काम लवकरात लवकर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.


५० टक्के जमीन आरक्षित

आ. अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ई-वॉर्डच्या मंजूर विकास आराखड्यातील (भूकर क्र. ५९३ क्षेत्र) जमिनीवरील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचा विस्तार या आरक्षणामध्ये फेरबदल मंजूर झाला आहे.

त्यानुसार निव्वळ आरक्षित क्षेत्राच्या ५० टक्के जमीन उद्यान विस्तारासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. विकास योजनेमध्ये आरक्षित असलेल्या क्षेत्राचा ताबा महापालिकेला देण्यात अाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यानी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा