Advertisement

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत मोठी वाढ

महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत मोठी वाढ
SHARES

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ व्हावे यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.

या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक शिष्यवृत्तीत 500 ते 1000 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी एकूण 23.11 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी ही मदत केवळ 100 ते 200 इतकीच होती.

सुधारित शिष्यवृत्ती रक्कम

  • इयत्ता 9वी व 10वी (निवासी विद्यार्थी): 800

  • इयत्ता 9वी व 10वी (अनिवासी विद्यार्थी): 600

  • इयत्ता 11वी व 12वी (निवासी विद्यार्थी): 1000

  • इयत्ता 11वी व 12वी (अनिवासी विद्यार्थी): 800

अतिरिक्त लाभ

  • अंध विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ता:150

  • शैक्षणिक सहलीसाठी (इयत्ता 11वी-12वी): वार्षिक 1500 पर्यंत मदत

या निर्णयामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार आहे.



हेही वाचा

405 शाळांचा विकास करण्यात येणार : शिक्षणमंत्री दादा भुसे

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा