Advertisement

लहान मुलांनाही माॅलमध्ये ‘असा’ मिळणार प्रवेश, राज्य सरकारची सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे.

लहान मुलांनाही माॅलमध्ये ‘असा’ मिळणार प्रवेश, राज्य सरकारची सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
SHARES

राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा केली आहे.

राज्यात १८ वर्षाखालील मुला-मुलींच्या लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा- लोकल, मॉल सुरू; वाचा काय बंद? काय सुरू?

राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. तसंच, शॉपिंग मॉल्स, हॉटेल व्यावसायिकांनाही निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे.

शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, जिम आणि स्पा ५० टक्क्यांच्या उपस्थितीत रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, धार्मिक स्थळे, सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंदच राहणार आहे.

हेही वाचा- गार्डन आणि चौपाट्यांबद्दल पालिकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्रवेशाची योग्य वेळ


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा