Advertisement

आता ५ हून अधिक कोरोना रुग्ण असणारी इमारत होणार ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’

५ किंवा त्याहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणारी इमारत ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता ५ हून अधिक कोरोना रुग्ण असणारी इमारत होणार ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’
SHARES

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून हर तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात भर म्हणून आता ५ किंवा त्याहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणारी इमारत ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना सोमवारी जारी करण्यात आल्या आहेत.

 • राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ५ किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला मायक्रो कंटेन्मेंट झोन ठरविण्यात येणार आहे.
 • संबंधित ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. या दंडवसुलीचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला असेल.
 • संबंधित इमारतीला ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ ठरवायचं की नाही याबाबतचा निर्णय देखील आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच घेईल.
 • इमारत किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित झाल्यास संबंधित इमारतीत केवळ वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवानांच मुभा असेल.
 • अत्यावश्यक सेवा किंवा वस्तू कोणत्या हे देखील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच ठरवेल.   
 • या इमारत/गृहनिर्माण संस्थेचं प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग एकच असेल.
 • इमारत परिसर दररोज स्वच्छ करणे, नियमितपणे सॅनेटाईज करणं रहिवाशांना बंधनकारक असेल.
 • बाहेरच्या वाहनांना इमारत आवारात प्रवेश नसेल.
 • एखाद्या रहिवाशाला टेलिमेडिसीनची गरज असल्यास त्यासाठी हा अधिकारी मदत करेल.
 • इमारत परिसरात सलग ५ दिवस एकही नवीन रुग्ण आढळून न आल्यास तसंच कोरोना रुग्णांची संख्या पाचपेक्षा कमी झाल्यावर सदर इमारत/गृहनिर्माण संस्था ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’मधून वगळण्यात येईल.
 • किराणा सामान विकत घेण्याच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या कारणामुळे होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी आता राज्य सरकारने किराणा दुकानांसाठी वेळ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान केवळ ४ तासच खुली राहणार आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा